पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जंगलमें मोर नाचा...

कोणे एके काळी आटपाटनगरमध्ये एक धनाढ्य माणुस राहात होता. (असे म्हणतात). जवळपास एक एकर जागेत त्याचा मोठा वाडा होता. तेवढ्याच जागेत एक तळघर होते व ते सोने-चांदीच्या दागिन्यानी भरलेले होते (असे म्हणतात). ही बाब आटपाटनगरातील काही पुढाऱ्यांना, म्हणजेच त्या काळातील प्रतिष्ठीत नागरिकांना ठाऊक होती (असे म्हणतात). तर एकदा काय झालं, गावात प्लेगची साथ आली. गावभर दवंडी पिटुन सूचना दिली गेली अन् रात्रितुन गाव खाली झालं (असेही म्हणतात). कदाचित फवारणी किंवा प्लेग समूळ नष्ट करण्यासाठी काही उपाय योजना केली असेल. काही दिवसानी जेव्हा ग्रामस्थ गावात परतले, तेव्हा प्लेगच्या साथीचे काय झाले माहीत नाही. पण 'तळघर' मात्र साफ झाले होते (असेच म्हणतात). तेव्हा लोकांना सर्वप्रथम आठवलं, 'जंगलमें मोर नाचा, किसने देखा- किसने देखा'... आता हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे... @ दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रभर अशीच दवंडी पिटली गेली... ० त्यानुसार दुसऱ्या एका आटपाट नगरात ढगफुटी होणार होती (असे म्हटले गेले) @ अन् पुन्हा एकदा आठवले... ' जंगलमे मोर नाचा.. .' ० @# आता यावेळी काय साफ झालं... ते कळेल लवकरच...०...

हा शिमगा कशासाठी ?

होलीकोत्सव... भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण. हा एकमेव असा सण आहे, ज्यामध्ये ईर्षा आणि उत्साह या दोन्ही परस्परविरोधी भावना एकमेकांच्या हातात हात घालुन वावरतात. त्याचा फायदा असा होतो की, आनंद व्यक्त करण्यासाठी जसा भरपुर उत्साह उपलब्ध असतो, तद्वतच 'बुरा न मानो होली है..' म्हटले की आपण सहजच ईर्षा, द्वेष, राग यासारख्या नकारात्मक भावनाही सहजच व्यक्त करून मोकळे होऊ शकतो. कदाचित म्हणुनच या सणाला 'शिमगा' असेही एक नाव आहे. अशा या शीमग्याच्या नावाखाली सध्या नाशिककर एका विशेष आयोजनावरून शासनाच्या विरोधात (बे)सुर आळवताना दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सर्वच प्रकारची माध्यमं आघाडीवर आहेत, अर्थात यालाही अपवाद आहेतच. पण, हे अपवाददेखील 'उत्साह' कमी आणि 'बुरा न मानो होली है..'चीच भूमिका घेत आहेत. परिणामी, जे दुखावले गेले ते समाज माध्यमांचा वापर करत आहेत आणि जे अस्तित्व सिध्द करू पहात आहेत, ते कुणाच्या तरी खांद्यावर बंदुक ठेऊन आपल्या हक्काच्या व्यासपीठावर वीद्वत्तेचा आव आणत आहेत. मात्र या दोन्ही प्रयत्नांत खरी खदखद मात्र कुणीही समर्पकपणे मांडू शकलेले नाही. खरेतर हे ...