पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी अस्मिता..

मराठी अस्मिता आणि आम्ही... कोणे एके काळी सदैव ऐरणीवर असणारा मराठी अस्मितेचा प्रश्न आज कुठे दिसत नाही. विशेषतः स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना अवघा महाराष्ट्र या एका प्रश्नावर एकवटलेला आपण बघितला आहे. त्यानंतरच्या काळात मात्र हा बाणा केवळ नावापुरताच अस्तित्व राखण्यासाठी धडपडताना दिसतोय. (मुंबई महापालिका निवडणुक काळात अनेकांना तसा उमाळा येईलही कदाचित; पण लोकसभा निवडणूकीत काय?). अगदीच स्पष्ट बोलायचे तर, मराठी माणसाला ही अस्मिता काय असते हेच अद्याप समजलेले नाही, असे दिसते. त्यासाठी थोडं इतिहासात डोकावण्याची गरज आहे. आता इतिहास म्हणजे लगेच महाराजांचा इतिहास आठवण्याची गरज नाही. अगदी अलिकडचा काळ बघु या... अर्थातच वंदनीय बाळासाहेब आणि शिवसेना हे दोनच मुद्दे पुरेसे आहेत. मुंबई आणि राज्यातही आज जी काही मराठी कर्तबगारी शिल्लक आहे, तिच्या पाठीशी हे दोनच मुद्दे ठळकपणे दिसतात. त्यामुळेच आजही मराठी माणुस महाराजांनंतर बाळासाहेबांनाच मानतो. पण असे असले तरी महाराष्ट्राचे राजकारण मात्र त्यांच्या विचारांपासुन भरकटत आहे. विशेष म्हणजे असे भरकटत असतानाही हे राजकारण बाळासाहेब आणि महाराजांच्याच ...

कसं व्हायचं ??,

अशाने कसं व्हायचं ??? हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला... आठवतं का ? कोणे एके काळी नाशिककरांनी यशवंतराव चव्हाण यांना याच पवित्र भुमितुन बिनविरोध निवडुन पाठवले होते. अर्थात त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. अन्यथा सुरतसारखा बोभाटा नसता का झाला... अवघ्या काही वर्षांतच परिस्थिती बदलली. आजमितीस देशात सार्वत्रिक निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. मात्र येथे सत्ताधाऱ्यांना उमेदवारच मिळेना... प्रत्यक्षात सक्षम (?) उमेदवारांची भलीमोठी यादी तयार आहे. अगदी तीनही पक्षांकडे अशा याद्या आहेत. त्यांना विजयाची खात्रीही वाटत आहे. पण दील्लीश्वर मात्र त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. कुठल्याही परिस्थितीत नाशिकची जागा गमवायची नाही, असा निर्धार भाजपने केलेला दिसतोय. (यामध्ये कदाचित गमवायची नाही म्हणजे मित्र पक्षालाही द्यायची नाही' असाच चंग महायुतीतील तीनही पक्षांनी बांधलेला दिसतोय). आता नाशिकमध्येही उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सगळेच इच्छुक कामाला लागले आहेत. ही जागा आपलीच असा आविर्भाव सर्वांचाच आहे. पण, सामान्य मतदार अजुनही Wait & Watch च्या भूमिकेत आहेत. तर दील्लीश्वरांचे म...