कसं व्हायचं ??,

अशाने कसं व्हायचं ???

हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला... आठवतं का ? कोणे एके काळी नाशिककरांनी यशवंतराव चव्हाण यांना याच पवित्र भुमितुन बिनविरोध निवडुन पाठवले होते. अर्थात त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. अन्यथा सुरतसारखा बोभाटा नसता का झाला...
अवघ्या काही वर्षांतच परिस्थिती बदलली. आजमितीस देशात सार्वत्रिक निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. मात्र येथे सत्ताधाऱ्यांना उमेदवारच मिळेना... प्रत्यक्षात सक्षम (?) उमेदवारांची भलीमोठी यादी तयार आहे. अगदी तीनही पक्षांकडे अशा याद्या आहेत. त्यांना विजयाची खात्रीही वाटत आहे. पण दील्लीश्वर मात्र त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. कुठल्याही परिस्थितीत नाशिकची जागा गमवायची नाही, असा निर्धार भाजपने केलेला दिसतोय. (यामध्ये कदाचित गमवायची नाही म्हणजे मित्र पक्षालाही द्यायची नाही' असाच चंग महायुतीतील तीनही पक्षांनी बांधलेला दिसतोय).
आता नाशिकमध्येही उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सगळेच इच्छुक कामाला लागले आहेत. ही जागा आपलीच असा आविर्भाव सर्वांचाच आहे. पण, सामान्य मतदार अजुनही Wait & Watch च्या भूमिकेत आहेत. तर दील्लीश्वरांचे मनसुबे मात्र वेगळेच आहेत. 
नाशिकला गुजराथ जवळ आहे... 
संविधानाप्रमाणेच मुंबईही धोक्यात आहे...
त्यापाठोपाठ नाशिकचे HAL, Note Press...
परिणामी नाशिकच्या जागेचा फैसला आता महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या हाती राहिलेलाच नाही. त्यासाठी थेट दिलिश्वरानी पुढाकार घेतलाय. त्यामुळे नाशिककरांनी 'त्यांच्या' पेक्षाही अधिक सावध राहण्याची गरज आहे. मतदानाची संधी आपल्या हाती आहेच. तेव्हा हे असेच चालु द्यायचे की अशाने कसे व्हायचे हा प्रश्न विचारायचा याचा विचार करण्यासाठी अजूनही वेळ आहे..!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा शिमगा कशासाठी ?

आम आदमी...